एस.के.एन. सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागात पालक सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

 एस.के.एन. सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागात पालक सभा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा



प्रतिनिधी -

एस.के.एन. सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्गातील विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांसाठी पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन करण्यात आले. 

सर्वप्रथम विभागाच्या वतीने पालकांचे स्वागत आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन आणि दिपप्रज्वलनाने झाली. पालक प्रतिनिधी आणि प्रमुख पाहुणे म्हणून अॅड. सिद्धेश्वर जाधव पाटील यांचा सत्कार विभाग प्रमुख डॉ. के. शिवशंकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर, यांनी सर्व पालकांचे स्वागत केले आणि विभागातील शैक्षणिक उपक्रमांबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यांच्या बळकटीच्या बाजू आणि सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी प्लेसमेंट आणि इंटर्नशिपसाठी आवश्यक असलेल्या कौशल्य संच व रोजगार क्षमतेसाठीच्या तयारीचे महत्त्व अधोरेखित केले. 

यानंतर विद्यापीठात यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध संस्थांमध्ये सहभागी होऊन पारितोषिके मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, व ट्रेनींग प्लेसमेंट ऑफीसर डॉ. समीर कटेकर यांनी पालकांशी संवाद साधला. डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलने उद्योगांच्या गरजा आणि प्लेसमेंट प्रक्रियेबाबत सखोल माहिती दिली. पालक प्रतिनिधी अॅड. सिद्धेश्वर जाधव पाटील यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच श्री. संजय पाटील यांनी संस्थेला आणि विभागाला उपयुक्त सूचना दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप सुविधा उपलब्ध करून देण्याचे व मंगळवेढा येथील संत दमाजी साखर कारखान्याला औद्योगिक भेट आयोजित करण्याचे आश्वासन दिले.

सर्व पालकांनी संबंधित शिक्षक मार्गदर्शकाशी भेट घेतली. वर्ग समन्वयकांनी युनीट टेस्ट-1 चा निकाल, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शैक्षणिक प्रगतीचा आढावा दिला. पालकांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला आणि उपयुक्त अभिप्राय दिला. त्यांनी प्राध्यापकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. काही पालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यास नियोजन कसे करावे, यावर मार्गदर्शन करण्याची सूचना दिली.

पालकांच्या अभिप्रायानंतर आणि प्राचार्यांच्या मार्गदर्शनानंतर ही बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली आणि सर्व पालकांचे आभार मानून समारोप करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.अंजली चंदणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कु. श्रद्धा पांढे आणि कु. अनुष्का राऊत यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.